वैभववाडी संजय शेळके
सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक कृषी संशोधन केंद्रफोंडाघाट दाखवण्यात आले.
कोकणामध्ये भात पिकाखालील क्षेत्र हे जवळपास 4.50 लाख हेक्टर वरून मागील काळात 3.89 लक्ष हेक्टर पर्यंत खाली आले आहे. तथापि शेती कामासाठी मजुरांचा तुटवडा व यांत्रिकीकरणाचा अभावामुळे यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करून डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यामार्फत सिंधू रत्न समृद्ध योजनेअंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला व बांबू इत्यादी पिकांच्या गतिमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये शेतीतील यांत्रिकीकरण गतिमान करण्यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजन करणे अल्प व अत्यल्प सुधारकांसाठी भात, ऊस, आंबा, काजू ,नारळ, सुपारी, मसाला, पिके बांबू शेतीच्या, विविध कामासाठी यांत्रिकीकरणाला बळ देणे आधुनिक तंत्रज्ञान यंत्रे अवजारांचा वापर वाढवणे व कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही उद्दिष्टे आहेत.
चालू वर्षांमध्ये सदर योजनेअंतर्गत कृषी संशोधन केंद्र फोंडा घाट यांच्यामार्फत वैभववाडी देवगड कणकवली आणि मालवण तालुक्यामध्ये तर प्रादेशिक व संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या मार्फत कुडाळ वेंगुला सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर स्वयंचलित भात लावणी मशीन ने एकूण 42 प्रात्यक्षिके घेण्यात आली येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना तांत्रिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भात आंबा काजू मसाला पिके इत्यादी पिकांच्या यांत्रिकीकरणाविषयी प्रशिक्षणे आयोजित केली जाणार आहेत सदर प्रशिक्षणे कृषी संशोधन केंद्र मन्नुत्थी,थ्रिसुर,केरळ, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली प्रादेशिक व संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांना आव्हान करण्यात येते की त्यांनी वेळीच नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा नाव नोंदणीसाठी डॉ व्ही एन शेटे कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट संपर्क क्रमांक 94 21 343562 किंवा डॉ व्ही एस देसाई प्रादेशिक व संशोधन केंद्र वेंगुर्ला संपर्क 94 22630389 यांच्याकडे संपर्क साधावा.
