करूळ ग्रामसभेत अमित चव्हाण यांचे आवाहन
वैभववाडी प्रतिनिधी
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपला आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. गावातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी रोजगार हमी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीला पुरक व्यवसाय उभारले पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी तांत्रिक सहाय्यक स्थापत्य श्री अमित चव्हाण यांनी केले.
करुळ येथे ग्रामसभा संपन्न झाली. पंचायत समिती वैभववाडी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाचे तांत्रिक सहाय्यक स्थापत्य श्री. अमित चव्हाण यांनी ग्रामस्थांना रोजगार हमी योजना विभागाच्या अनेक योजनांची माहिती दिली.
श्री. चव्हाण म्हणाले, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळी पालन शेड, शोषखड्डा, सिंचन विहीर, फळबाग लागवड त्यामध्ये नारळ, बांबू व कोकम, गांडूळ खत युनिट, बायोगॅस,नाफेड आदीबाबत चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.
लाभ घेण्यासाठी पुढे येणा- या तरुणांना, लाभार्थ्यांना विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे श्री अमित चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, उपसरपंच सचिन कोलते, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी, महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. श्री. चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामसेवक शशिकांत गुरव यांनी मानले.
