संत रोहिदास भवनसाठी पालकमंत्री चव्हाण यांची भेट

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने भरीव निधीची केली मागणी

⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संत रविदास भवन कामाच्या निधीसाठी सदिच्छा भेट घेण्यात आली.संत रविदास भवन निर्मितीसाठी भरीव निधी मिळावा म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट अँड.अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री उशिरा घेण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,ऍड.अनिल निरवडेकर,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण,उपाध्यक्ष सत्यविजय जाधव,चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते

.यावेळी रवींद्र चव्हाण यांनी संत रविदास भवनच्या कामा विषयी व उद्देशाविषयी जाणून घेतले.मंडळाच्या नावे भूखंड असून त्या जागी सुरू असलेले काम याविषयी सविस्तर माहिती घेतली.सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक,सांस्कृतिक अशा बहुद्देशीय असणाऱ्या व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या इमारतीची चर्मकार बांधववांना आवश्यकता असल्याने हे काम होणेसाठी भरीव निधी देण्यात येईल असे त्यांनी आश्वासीत केले.

सद्यस्थितीला सुरू असलेल्या कामाचीही माहिती घेऊन मंडळाच्या प्रयत्नांना त्यांनी दाद दिली.मंडळाच्या वतीने पालकमंत्री यांना निवेदन सादर करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा देण्यात आली.

You cannot copy content of this page