वीज ग्राहक संघटनेची वीज उप अभियंताकडे मागणी: गावातील वीज समस्या बाबत वेधले लक्ष..
सावंतवाडी
आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्राहकाला वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या व उपाय योजना राबवा अशी मागणी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सावंतवाडी वीज उप अभियंता यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली.
सावंतवाडी तालुक्यातील विविध प्रश्न घेऊन आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील उप अभियंता यांची भेट घेतली यावेळी त्यांनी चतुर्थी सण तोंडावर आला असताना गावात मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या भेडसावत आहेत काही ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने विद्युत उपकरणे निकामी होत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे एकूणच या साऱ्या प्रकाराला वीस वितरण कंपनी जबाबदार असून त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.चतुर्थी सण आनंदाचा उत्साहाचा असल्याने या काळात प्रत्येक ग्राहकाला अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी आत्तापासून उपायोजना आखा असे मागणे हे केली यावेळी कोनसी सांगेली देवसु आंबेगाव इन्सुली बांदा आदी भागातील समस्या लेखी स्वरूपात संघटनेच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय लाड आनंद नेवगी संजय नाईक जगदीश मांजरेकर बाळबोर्डेकर पुंडलिक दळवी सुनील देसाई राजू सावंत सुधीर मल्हार अमित राऊळ तसेच तालुक्यातील वीज धारक उपस्थित होते.
