सौ. स्वाती पाटील:दहावी व डिग्री परीक्षेत विशेष प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार…
बांदा/प्रतिनिधी
योगामुळे मनाची एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दररोजच्या अभ्यासाबरोबरच योगाभ्यासावर देखील लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन योग शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांनी येथे केले.
येथील महिला मराठा समाजाच्या वतीने बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. पाटील बोलत होता. यावेळी व्यासपीठावर बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष बाळु सावंत, केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, महिला मराठा समाज अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, सचिव सौ. माधवी गाड आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दहावी परीक्षेत व डिग्री परीक्षेत विशेष प्रविण्य मिळविलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी सौ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगा विषयी सविस्तर माहिती दिली. बाळु सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत भविष्यात देखील मुलांनी आपल्या समाजाचे व देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले. उर्मिला मोर्ये यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रस्ताविकात सौ. स्वाती सावंत म्हणाल्या की, गेल्या दोन तीन वर्षात कोरोनामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही, मात्र यावर्षी पासून पुन्हा गुणगौरव सोहळ्याला सुरुवात केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ऋतुजा सावंत यांनी केले. आभार सौ. ममता सावंत यांनी मानले.
यावेळी रेश्मा सावंत, शिल्पा सावंत, सुरभी सावंत, अवंती पंडित, स्वप्नीता सावंत, अल्पिता गाड, लक्ष्मी सावंत, रुपाली सावंत, राखी कळंगुटकर, सिद्धी माजगावकर, मृणाल नाईक, सुचिता मुळीक, शालन देसाई, सुशांती सावंत आदी मराठा महिला उपस्थित होत्या.
