वैभव राऊळ, बबन गावडे,अनिल चव्हाण, बुधाजी पाताडे यांची मागणी
⚡आंबोली, ता.०७-: चौकुळ चुरनीची मूस येथील रस्ता अत्यंत खराब असून मोठे मोठे खड्डे दगड आणि कच्चा रस्ता यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर असून ठेकेदाराच्या बेफिकिरी मुळे लोकांचे हाल होत आहेत याकडे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ,
शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे,अनिल चव्हाण,बूधाजी पाताडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून चौकुळ चुरणी ची मूस रस्त्याचे काम मंजूर असून शुभारंभ मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता.मात्र अजून ठेकेदाराचे काम पुढे सरकले नाही.मोरी ला मोठे मोठे भगदाड आहेत.मोठे खड्डे आहेत.पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी मुश्किल या रस्त्यावरून होत होती.त्यामुळे या रत्याचे काम तत्काळ सुरू करावे.जर तो ठेकेदार करत नसेल तर दुसरा ठेकेदार नेमून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी चूरणीची मूस ग्रामस्थांची आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार.
आंबोली राघवेश्वर रस्ता ते ओवळीची मोरी इथपर्यंत रस्त्याचे काम केले त्यासाठी १ कोटी ६८ लाख रुपये या कामासाठी खर्च केले.मुख्यमंत्री सडक योजना ही नवीन रस्त्यासाठी आहे मात्र जुना रस्ता फक्त साईड पट्टी करून नवीन रस्ता दाखवून लाखो रुपये या रस्त्यावर नवीन रस्ता दाखवून खर्च दाखवले आहेत.डॉक्टर सिन्हा यांच्या घराजवळ मोरी ला कठडा बांधलेला नाही.फौजदार वाडी ते राघवेश्वर हा कच्चा केलेला आधी रस्ता होता फक्त खडीकरण करण्यात आले.त्यामुळे मुख्यमंत्री सडक योजनेच्या नवीन कामाचे स्ट्रक्चर असताना जुने काम असताना ते न दाखवताच बिल देण्यात आली आहे. त्या मुळे या सर्व कामाची चौकशी करावी यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.या रस्त्याचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते मात्र ग्रामस्थांनी दणका देताच त्याने नंतर काम सुधारले होते.भ्रष्ट अधिकारी ठेकेदार आणि संगण मताने हे काम सुरू होते.यात लाखो रुपयांचा घपला झाला होता.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाची चौकशी करावी तसे यात भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
