महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

कोकणच्या विकासासंदर्भात चर्चा

⚡सावंतवाडी ता.०७-: भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची त्यांच्या सावंतवाडी येथील ‘सरस्वती’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
ॲड. राहुल नार्वेकर कोकण दौऱ्यावर आले असता नार्वेकर व नितेश राणे यांच्यात कोकणच्या विकासासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.
कोकणच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार असा शब्द विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर यांनी आ. नितेश राणे यांना दिला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page