सोनुर्ली येथे साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत होरपळून वृद्ध जखमी

सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद

⚡सावंतवाडी,ता.०६-: सोनुर्ली माऊली मंदिर परिसरात घराच्या बाजूला साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत एक वृद्ध होरपळून जखमी झाले. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. नारायण महादेव म्हापसेकर (६६), असे त्यांचे नाव आहे. दरम्यान त्यांना नातेवाईकांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात सुद्धा नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हापसेकर हे आज सायंकाळच्या सुमारास आपल्या घराचा परिसर साफ करत होते. यावेळी त्यांनी सुख्या गवताला व कचऱ्याला आग लावली होती. त्या आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्यामुळे ती इतरत्र पसरेल या भीतीने जखमी म्हापसेकर आग विझवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र अंदाज न आल्याने आगीची ठिणगी त्यांच्या कपड्यावर पडली आणि कपड्यांनी पेट घेतला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. सद्यस्थितीत त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

You cannot copy content of this page