धाकोरे येथील सुनील मुळीक यांना राज्यस्तरीय अष्टपैलू काव्यभूषण गौरव पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ -: मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी यांच्यावतीने देण्यात येणारा अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार धाकोरे येथील सुनील जयवंत मुळीक यांना प्राप्त झाला आहे.

धाकोरे येथील सुनील मुळीक हे सातत्याने काव्यलेखन करत आहेत. तसेच वेगवेगळ्या स्पर्धेतून त्यांनी पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्यावतीने अष्टपैलू काव्यभूषण गौरव* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page