⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील ज्या व्यापारी बांधवांची वजने, मापे, इलेक्ट्रिक काटे यांची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे त्यांनी आपली वजने मापे यांची फेरपडताळणी व मुद्रांकन (शिक्का) करण्यासाठी दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नेमळेकर स्केल, मेढा मालवण याठिकाणी घेऊन यावीत. किराणा दुकान, पीठ गिरण, काजू व्यापारी, भंगारवाले, मच्छीमार सोसायटी, मच्छी व्यापारी, परमिट रूम, स्वीट मार्ट, हार्डवेअर, भाजी व फळ व्यापारी, सराफ, रॉकेल विक्री, रेशन दुकान, कापड दुकान आदी इतर व्यापाऱ्यांनी वजने मापे यांची फेरपडताळणी व मुद्रांकन करून घ्यावी, असे आवाहन विजय नेमळेकर यांनी केले आहे.
मालवणात २० रोजी वजन मापे फेरपडताळणी व मुद्रांकन
