⚡वेंगुर्ला ता.१८-: मातोश्री कला, क्रीडा मंडळ दाभोली नाका-वेंगुर्ला यांच्यातर्फे साज-या होणा-या श्री देवी नवदुर्गा मातोचा सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२२ समितीच्या अध्यक्षपदी विलास गावडे तर उपाध्यक्षपदी संदेश निकम यांची निवड करण्यात आली.
सलग २७व्या वर्षी दाभोली नाका येथे नवदुर्गा मातेचा सार्वजनिक नवरात्रोत्सव होणार आहे. यावेळी दशावतारी नाटक, फुगडी महोत्सव, संगीत भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दांडिया, खेळ पैठणीचा, रेकॉर्ड डान्स, वारकरी व संगीत भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रम नियोजनासाठी पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकी दरम्यान मंडळाचे अध्यक्ष दादा कुबल, वसंत तांडेल, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, जयंत मोंडकर, तुषार साळगांवकर, प्रभाकर आजगांवकर, सुनिल मजरेकर, भूषण आंगचेकर, बाबली वायंगणकर, पपू परब, शरद मेस्त्री, दादा केळुसकर, दत्ताराम आजगांवकर, बाळू प्रभू, प्रसाद मांजरकर, प्रमोद वेर्णेकर, तन्मय जोशी, ऋत्विक आंगचेकर, अविनाश सडवेलकर, राहूल मडईकर, श्रीकांत रानडे आदी उपस्थित हते.
फोटो – विलास गावडे, सदेश निकम
