विद्युत रोहित्रावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार…

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत यांचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी
पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या तारकर्ली – देवबाग या गावाच्या हमरस्त्यावरील विजवितरण कंपनीचे बहुतांश विद्यूत रोहित्र (डी पी ) हे धोकादायक बनले असून अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. विज वितरण कंपनीने केलेल्या या दुर्लक्षामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास विज वितरण कंपनीला जबाबदार राहणार असल्याचा इशारा देतानाच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी लवकरात लवकर या विद्युत रोहित्रावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी रविवारी तारकर्ली देवबाग येथील ग्रामस्थांशी भेटी घेत विकासकामांवर चर्चा केली. यावेळी तारकर्ली आणि देवबाग सीमेवर असणाऱ्या विज वितरणचा डिपी हा उघडाच असून जीवितास धोका असल्याचे सांगितले. त्यावर तत्काळ दरवाजा लावणे गरजचे असल्याचे सांगितले. त्यानंतर अशोक सावंत यांनी संबंधित डिपीची पाहणी केली. या विद्युत रोहित्राच्या विज वाहिन्या खाली पडलेल्या आहेत. डिपीला दरवाजा नाही. सध्या जिल्ह्यात शॉक लागून विज वितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. इथे तारकर्ली, देवबाग या हमरस्त्यावर डिपी उघडा ठेवण्यात आला आहे. याच गावात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या पर्यटन गावात विज वितरणने विद्युत रोहित्र अशा प्रकारे ठेऊन अपघातास निमंत्रण देत आहे. या डिपीला झाकण पण नाही आणि रस्त्यापासून दोन फुटाच्या अंतरावर हा डिपी बसविण्यात आला आहे. एखाद्या लहान मुलाचा सुद्धा हात लागू शकतो. विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. शिवाय धोकादायक वळणावर हा विद्युत रोहित्र आहे. त्यामुळे वाहनांचा अपघातही होऊ शकतो. विज वितरणचा हा निष्काळजीपणा ग्रामस्थांच्या जीवावर बेतू शकतो. आणि जर दुर्घटना घडल्यास याला विज वितरण जबाबदार राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विद्युत रोहित्रावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार असल्याचा अशोक सावंत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page