मालवण नगरपरिषदेच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र शासनाकडून दखल

⚡मालवण ता.१८-: कचरा मुक्त शहर हि संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमाची घोषणा केली असून या कार्यक्रमांतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस सेवाभावी संस्था, हॉटेल व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी सहभागी होऊन स्वच्छता शपथ घेऊन शहरातील विविध समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता करत किनारे चकाचक केले.

या स्वच्छता मोहिमेत स. का पाटील महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, टोपीवाला महाविद्यालय, भंडारी हायस्कुल, कान्याशाळा तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट, झालझुल दांडी मित्रमंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मातृत्व आधार फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यापारी, पत्रकार, अतिथी बांबू हॉटेलचा सर्व स्टाफ, मच्छीमार बांधव, लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये दांडी, बंदर जेटी, राजकोट, मेढा, चिवला आदी किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे आणि आनंद मालवणकर, नगरपालिकेचे शहर समन्वयक निखिल नाईक, मुख्य लिपिक महेश परब, आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते, बांधकाम विभागातील सुधाकर पाटकर, सोनाली हळदणकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आपा लुडबे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रदीप सुर्वे, सहायक बंदर निरीक्षक श्री. परदेशी, मातृत्व आधार फाउंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, जगदीश तोडणकर आदी व इतर सहभागी झाले होते.

केंद्रीय मंत्रालयाकडून दखल

या सागरी किनारा स्वच्छतेची माहिती मालवण नगरपरिषदेकडून राज्य व केंद्र शासनाला देण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेची दखल केंद्रीय आवास आणि शहरी कार्यालय मंत्रालयाने घेतली. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेची माहिती देणारे ट्विट या मंत्रालयाकडून करण्यात आले. स्वच्छ अमृत महोत्सवा अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशभरातील एकूण १८०० शहरे सहभागी झालेली असून त्यापैकी काही मोजक्याच शहरांना केंद्र शासनाच्या ट्विटर हँडलवर झळकण्याचा मान मिळाला असून केंद्र शासनाने दखल घेतलेले मालवण हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांकडून असाच प्रतिसाद मिळाला तर यावर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सुद्धा मालवण देशपातळीवर चांगला क्रमांक मिळवू शकेल, अशी आशा मुख्याधिकारी संतपश जिरगे यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page