वाढदिवस कार्यक्रमात संदेश पारकर यांचे प्रतिपादन
⚡कणकवली ता.१४-: संकटाच्या काळात आम्ही रणांगण सोडलेले नाही. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमची लढाई सुरु आहे. पद असो अथवा नसो जनतेचा विश्वास आणि पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यासारखा नेता कधी डगमगणार नाही.तुम्ही साथ द्या… पाठबळ द्या… मी निश्चितपणे जनतेच्या भल्यासाठी काम करेन. कारण आम्ही लढवय्ये आहोत.आणि आमचा हा लढा ध्येयाचा पाठलाग करताना शेवटपर्यंत सुरूच राहील आणि यात निश्चितपणे यशस्वी होऊ.असा विश्वास कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला .
वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना संदेश पारकर पुढे म्हणाले,मैत्री कशी असावी याचे उदाहरण सुबोध टिकले यांनी दाखवून दिले होते.त्यांची ती आठवण जोपसण्यासाठी रक्तदान शिबिरातून जीव वाचवण्याचे काम आम्ही करत आहोत.माझा वाढदिवस म्हणजे केवळ मोठे पणासाठी नव्हे.तर सामाजिक जाण ठेवत समाजाचे आपण देणे लागतो याभावनेतून साजरा करत आहे. सेवाभावी काम उभे राहावे.आणि त्यातून समाजातील तळागाळातील घटकाला मदत देऊन जनतेचे आशीर्वाद व प्रेम मिळते. हेच प्रेम काम करताना आणखीन ऊर्जा देते. म्हणुनच हे उपक्रम सुरु आहेत.मी पदावर होतो. तेव्हाही जनतेशी नाळ होती. आणि पदावर नसताना हि माझी नाळ हि जनतेशी आहे.कारण संकट काळात डगमगणारा मी नव्हे. पुढे काय होईल याची चिंता आम्ही बाळगत नाही. जनतेवर होणाऱ्या अन्याय विरोधात आमचा लढा सुरूच असून विकासासाठी आमची लढाई आहे. जनतेची इच्छा आहे कि संदेश पारकर यांचे नेतृत्व मोठे व्हावे. जनतेसाठीच आम्ही काम करत आहोत.परंतु राजकारणाची अवस्था सापशिडीच्या खेळासारखी झाली आहे.झेप घेत असतानाच कधी खाली यावे लागेल याची शाश्वती राहिलेली नाही.किती संघर्ष झाला तरी आम्ही डगमगणार नाही. असे सांगताना ते म्हणाले, कि आम. वैभव नाईक यांनी जी निष्ठा राखिली ती कौतुकास्पद आहे.राणेंचा पराभव करणाऱ्या नाईक यांना मंत्री पद मिळाले असते. तर विकाऊ नये तर निष्ठावंत समोर दिसले असते.असे सांगतानाच शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या पाठीत खंजीर घुपसणाऱ्याना शिवसैनिक धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अँड .खलप यांचे गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे.त्याचे आशीर्वाद पाठीशी असल्यने मला हि त्यांचा अभिमान वाटतो.असे त्यांनी सांगितले. यावेळी संदेश पारकर यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याभरातून कार्यकर्ते पदाधिकारी तसेच संदेशप्रेमींनी गर्दी केली होती.
