अर्चना घारे परब यांचा प्रश्न;पुन्हा शरद पवार यांच्या वि
रोधात बोलल्यास जशास तसे उत्तर देण्याचा दिला इशारा
⚡सावंतवाडी ता.१४-: शांत संयमी सहनशील आणि सुसंस्कृत अशी ओळख निर्माण करून मतदार संघातील जनतेचा विश्वास घात करुन तीनवेळा निवडून येणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांना नक्की काय झाले आहे. असा सवाल राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील विरोधकांना चांगले संस्कार नाहीत. मोठ्यांचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. असे उपदेश देणारे आमदार दीपक केसरकर हे स्वतःच आपल्या पेक्षा वयाने ज्येष्ठ आणि कर्तुत्वाने श्रेष्ठ असणारे शरद पवार यांच्यावर मात्र खोटे आणि बेछूट आरोप करत आहेत. ज्यांनी खाद्यावर घेतले त्याच्याच डोक्यावर पाय देऊन पुढे जाण्याची आमदार दीपक केसरकर यांची संस्कृती आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी यापुढे असे कोणतेही वक्तव्य केल्यास राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा अर्चना घारे परब यांनी दिला आहे.
