रेट अलर्टमुळे आमदार केसरकर यांची उद्याची सभा रद्द

जिल्ह्यात १५ व १६ रोजी अतिवृष्टी

⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १५ व १६ जुलै रोजी रेट अलर्ट जाहीर केल्याने आमदार दीपक केसरकर यांची आयोजित करण्यात आलेली उद्याची सभा रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे.

या सभेत आमदार दीपक केसरकर हे आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करणार होते. या सभेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गजानन नाटेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page