मालवणात चातुर्मास कीर्तन प्रवचनमालेस प्रारंभ

⚡मालवण ता.१४-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे गेली १६ वर्षे चातुर्मासात एकादशीला कीर्तन, प्रवचनमाला आयोजित केली जात असून या वर्षीही या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले असून आषाढी एकादशी दिवशी पहिले पुष्प महेश धामापूरकर यांनी गुंफले. त्यांनी ‘श्री शिव-पार्वती विवाह’ या विषयावर कीर्तन केले. सुधीर गोसावी यांनी तबला, तर नीलेश गवंडी यांनी त्यांना हार्मोनियम साथ केली.

यावेळी शिवाजी वाचनालयाच्या अध्यक्षा मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कार्यवाह वैदेही जुवाटकर, विश्वस्त रुजारिओ पिंटो, सुहास ओरसकर, सदस्या अक्षता बांदेकर, बबन परुळेकर व श्रोतृवर्ग उपस्थित होता. या प्रवचनमालेत २४ जुलै रोजी विनोद सातार्डेकर (राघवाची कथा), ८ ऑगस्ट रोजी अक्षय परुळेकर (नाभाग चरित्र), २२ ऑगस्ट रोजी अक्षय सातार्डेकर (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), ६ सप्टेंबर रोजी डॉ. सुभाष दिघे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज), २१ सप्टेंबर रोजी प्रभूदास आजगावकर (द्रौपदीची अक्षयथाळी), ७ ऑक्टोबर रोजी वळंजू सर (रामकृष्ण परमहंस), १९ रोजी शेवडे सर (इंद्रजन्माचे आख्यान), ४ नोव्हेंबर रोजी मेघा शेवडे (चिलयाबाळ) आदी प्रवचनमाला सादर करणार आहेत. सर्वानी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page