मालवण तेली समाज मंडळातर्फे होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡मालवण ता.१४-: मालवण तेली समाज उन्नती मंडळाच्या पारितोषिक योजने अंतर्गत २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षांत तेली समाजातील दहावी बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १४ ऑगस्ट रोजी हॉटेल लीलांजली, भरड मालवण येथे होणार आहे.

यासाठी तेली समाजाच्या सभासद व पालकांनी २०२० ते २०२२ या वर्षात दहावी मध्ये ७० टक्के व बारावी परीक्षेत ६० टक्के गुण मिळविलेल्या तसेच पदवी, पदविका मिळविलेल्या पाल्यांची गुणपत्रके झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून नाव, पत्ता, व फोन नंबर या माहितीसह मंडळाचे सचिव मंगेश शेर्लेकर, ११६२ ब, गुरुकृपायोग, केळबाई मंदिर रोड वायरी मालवण यांच्याकडे ५ ऑगस्ट पर्यंत द्यावेत किंवा पोस्टाने पाठवावेत. संबंधित विद्यार्थ्यांनी दि. १४ ऑगस्ट रोजी २ वाजता हॉटेल लीलांजली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तेली समाज मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page