टोपीवाला हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

⚡मालवण ता.१४-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्पर्धा परीक्षा विषयावर सीमाशुल्क विभागातील अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांचे व्याख्यान झाले. रेडकर यांनी विविध स्पर्धा परीक्षा, यूपीएससी-एमपीएससी स्टाफ सिलेक्शन या परीक्षांच्या माध्यमातून दहावी, बारावी आणि पदवीनंतर कोणकोणत्या परीक्षा देता येतात व त्यासाठी कोणत्या विषयांचा कसा अभ्यास करायचा, यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागामध्ये अधिकारी पदावर मुंबई येथे कार्यरत असणारे सत्यवान रेडकर मूळचे सिंधुदुर्गातील असून आपल्या कोकणातील मुलांनी शासकीय परीक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी बनण्यासाठी अभ्यास कसा करावा, यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, साटम, सौ. आचरेकर, पवार तसेच पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page