गरजू मुलींना मोफत सायकल वाटप

रोटरी क्लब ऑफ बांदाचां उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे बुधवारी येथील आनंदी मंगल कार्यालयात गरजू होतकरू मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने या कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरूंचा सत्कारही करण्यात आला.


यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे, बँक ऑफ इंडिया बांदाचे शाखाप्रबंधक अंकित धवन, रोटरीचे जीएसआर आनंद रासम, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, सावंतवाडी रोटरी क्लबचे सेक्रेटरी प्रमोद भागवत, बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष प्रमोद कामत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद भिडे यांनी केले व या कार्यक्रमाचे इव्हेंट चेअरमन तुषार धामापुरकर हे होते.
प्रास्तविक मंदार कल्याणकर यांनी केले. यामध्ये बांदा रोटरीचा अहवाल व भविष्यातील होणारे प्रकल्प याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डीजी गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांच्या संकल्पनेतून ‘गर्ल्स पेडल पावर’ या उपक्रमामधून या सायकली मुलींना देण्यात आल्या. बांदा रोटरी मधून दहा सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी नीता गोवेकर, आनंद रासम यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री काळे व अंकित धवन यांनी आपले विचार मांडले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक गणेश गर्दे व ज्येष्ठ मूर्तिकार सुरेश गुळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बांदा रोटरीचे सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, सुदन केसरकर, सुधीर शिरसाठ, प्रवीण शिरसाठ सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, स्वप्निल धामापूरकर, पिंटू गायतोंडे मनसुख वासानी, डॉक्टर जगदीश पाटील, सचिन मुळीक, स्वागत नाटेकर, संदीप देसाई, शितल राऊळ, दिलीप कोरगावकर, सुनील राऊळ ,संजय शिरोडकर रत्नाकर आगलावे ,शिवानंद भिडे ,योगेश परुळेकर ,श्वेता कोरगावकर इत्यादी उपस्थित होते. आभार फिरोज खान यांनी मानले.

You cannot copy content of this page