शक्ति केंद्रप्रमुख यांच्या घरावर झळकली नावाची पाटी

भाजप पक्षाच्यावतीने चिंचवली येथून अभियानाला सुरवात

कणकवली २० एप्रिल (प्रतिनिधी)-६ एप्रिल हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा स्थापना दिवस असून या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र् प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व शक्तिकेंद्रप्रमुख तथा विभागातील पक्षाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या घरावर त्यांच्या स्वतःच्या पदाच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आला असून या अभियानाची सर्व प्रथम सुरवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावातून करण्यात आली.

यावेळी खारेपाटण ग्रामीण विभागाचे शक्तिकेंद्रप्रमुख तथा भाजप कार्यकर्ते श्री सूर्यकांत भालेकर यांच्या घरावर चिंचवली येथे पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांच्या नावाची पक्षाची विशेष ओळख असणारी पाटी लावण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी भाजप कणकवली ग्रामीण तालुकाअध्यक्ष संतोष कानडे, जि प सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,पं स सदस्य दिलीप तळेकर,राजेश जाधव,भरत चव्हाण,चिंचवली सरपंच सौ रुंजी भालेकर,उपसरपंच अनिल पेडणेकर,अशोक पाटील,रवींद्र गुरव,श्रीकांत भालेकर,महेश बांदिवडेकर,राजेंद्र भालेकर, सुशील भालेकर,सागर भालेकर आदी मान्यवर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page