आरोग्य मेळाव्याला मोठा प्रतिसाद

केंद्र व राज्य शासन अंतर्गत आरोग्य विभागाचे आयोजन

सावंतवाडी ता.२०-:* आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य आरोग्य मेळाव्याला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी रुग्णांची आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्व आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली या मेळाव्याचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, येथील पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ. महेश खलीपे, तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव, डॉ. गिरीशकुमार चौगुले, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, शिवसेनेचे अशोक दळवी आदी उपस्थित होते यावेळी भिषक तज्ञ डॉ. निर्मला सावंत, डॉ अभिजीत चितारी, शल्यचिकित्सक डॉ गिरीश चौगुले, अस्थिरोगतज्ञ डॉ कश्यप देशपांडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. संदीप सावंत,त्वचारोग तज्ज्ञ डॉ चेतन म्हडगुत, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ लीना परुळेकर, मनसोपचार तज्ञ डॉ रुपाली पाटील, दांतचिकित्सक डॉ समीर धाकोरकर, स्त्री रोग तज्ञ ज्ञानेश्वर दूर्भाटकर, नेत्र चिकित्सा अधिकारी शुभजित धुरी, कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रदिप वाककर श्री धोतरे आदींनी रुग्णांची तपासणी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सोन्सुरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अदिती कशेळीकर यांनी केले

You cannot copy content of this page