देऊळवाडा मसुरे रमाई नदी पात्रातील गाळ उपशास प्रारंभ

मालवण ता.२०-:* मालवण तालुक्यातील बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेल्याने नदीपात्रातील गाळ उपसा काढण्यात यावा, अशी मागणी गेले २५ वर्ष येथील ग्रामस्थ करत आहे. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून रमाई नदी पात्रातील गाळ उपसास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांमांकडून समाधान व्यक्त होत आहे.

रमाई नदीच्या पाण्यावर येथील अनेक एकर शेती अवलंबून असायची मात्र गेल्या काही वर्षात रमाई नदीचे पात्र गाळाने बुजत गेले. याचा परिणाम म्ह्णून पावसाळ्यात मोठा पूर येत शेती बाधित तर उन्हाळ्यात कोरडी स्थिती असे चित्र गेली काही वर्षे दिसून येत होते. नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा यासाठी येथील ग्रामस्थांनी संघर्ष करत उपोषणाचा मार्गही अवलंबला. देऊळवाडा ग्रामपंचायततीने सातत्याने शासन स्तरावर पाठपुराव सुरू ठेवला. अखेर शासनाच्या माध्यमातून नदी पात्रातील गाळ उपसास प्रारंभ झाला असून ग्रामस्थ शेतकारी यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गाळ उपासासाठी जलसंपदा विभागाला आवश्यक ते सर्व सहकार्य ग्रामस्थांच्या माध्यमातून केले जात आहे. शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनीही सुरू असलेल्या गाळ उपसा कामाची पाहणी करत पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण होण्यासाठी काही मदत लागल्यास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश (पिंट्या) गावकर, दीपक आंगणे, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते.

चार दिवसापूर्वी खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल सरपंच अदिती मेस्त्री व ग्रामपंचायत सदस्य अशोक मसुरकर यांनी गावच्या वतीने खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे आभार मानले. यावेळी माजी जी. प. सदस्य नागेंद्र परब, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, सरपंच अदिती मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र सावंत, ग्रा.प. सदस्य अशोक मसुरकर, चंद्रकांत राणे, मर्डे सरपंच संदीप हडकर,वर्षाराणी अभ्यंकर, दिलीप सावंत, तातू सावंत, राजेश चिंदरकर, नारायण परब, महेश बागवे, रावजी बागवे, रामदास सावंत, रंजना बागवे, उल्हास मेस्त्री, दिलीप सावंत, कृष्णा बागवे, संतोष काळसेकर, प्रफुल्ल सावंत, सोनू सावंत, विश्वनाथ सावंत, फटूजी बागवे, बाळकृष्ण् मुंडले, सदानंद कबरे, सोनूपंत बागवे, सुरेश घाडीगावकर मनीषा बागवे, संदीपा कबरे, राजश्री सावंत, प्रसन्ना मेस्त्री, सानिका सावंत, अंकिता सावंत, अनिता सावंत, गीतेश्री मसुरकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page