चिपळूण महापुरात सहकार्य करणाऱ्या मालवण आपत्कालीन ग्रूपचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

*💫ओरोस दि.२६-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आलेल्या महापूरात मदतकार्यामध्ये सहभागी झालेल्या मालवण येथील मालवण आपत्कालिन ग्रुपचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.        यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी अधिकारी उपस्थित होते.     चिपळूण येथे पुर आलेला असताना  मालवण आपत्कालिन ग्रूपने मदतकार्य केले. त्यामुळे पालकमंत्री सामंत यानी त्यांचा सत्कार केला. यावेळी  दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, अझीम मुजावर, वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, चैतन्य मुळेकर, तुषार मराळ, उमेश ढाके, निलेश पुराळकर, दिनेश तोडणकर, प्रथमेश आढाव, महेश हर्णेकर, ओमकार केळूसकर, प्रशांत रसाळ, देवेंग्र मराळ आणि अक्षय मराळ हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page