बावशी आंदोलनस्थळी संदेश पारकर यांनी दिली भेट ; उपोषण सुरू

*💫कणकवली दि२६-:* कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येवू नये .या मागणीसाठी आज सकाळपासून सुरू झालेले उपोषण सुरूच असून शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे‌.आंदोलक आपल्या मागणीवरून ठाम असल्याने संबंधित विभागाने लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्यास उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा आंदोलन स्थळी ग्रा.पं.सदस्या मनश्री कांडर व दिपक कांडर यांनी दिला आहे. यावेळी संदेश पारकर यांच्यासोबत शिवसेना तालुका शैलेश भोगले , संदेश पटेल,हर्षद गावडे,निलम सावंत , नांदगाव सोसायटी व्हाईस चेअरमन सुनिल पवार, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर,आबू मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य मनश्री कांडर , माजी सरपंच सौ.सुप्रिया रांबाडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश रांबाडे,माजी ग्रा.पं.सदस्य दिपक, सोनाली शिंदे,स्वरुपा खडपे , वैशाली कदम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बावशी गावठण, बौद्धवाडी, शेळीचीवाडी वाडीतील नागरिक व रेशनकार्डधारक पाठींबा देण्यासाठी ग्रामपंचायत आवारात उपस्थित होते.

You cannot copy content of this page