पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
*💫ओरोस ता.२६-:* तिलारीचा प्रश्न राज्यस्तरीय असल्याने १५ दिवसांत मंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल. येथील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी अद्यावत वायरलेस यंत्रणा उभारली जाणार आहे. मल्हारपुर पर्यायी व्यवस्थेसाठी २५ लाख खारेपाटण मधील छोटी पुल दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये, अतिवृष्टीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पतन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये अशाप्रकारे जिल्हा नियोजन मधून तात्काळ निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी दिली. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती येवून गेल्यानंतर पालकमंत्री सामंत प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आज आले होते. खारेपाटण, नाटळ, कनेडी, मल्हार पुल, पामतेल येथे भेटी दिल्या. यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासना सोबत बैठक घेत माहिती घेतली. बैठक आटोपल्यावर पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी आ वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
