सावंतवाडीत गॅस पाईपलाईन साठी खोदण्यात आलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने अपघाताची दाट शक्यता…

संबंधित ठेकेदारांनी त्वरित दक्षता घेऊन उपयोजना करावी: अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मागणी

⚡सावंतवाडी ता.३१-:
सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून, ते रस्ते अद्यापही व्यवस्थित बुजवले जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या खोदकामामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, एखाद्या नागरिकाला गंभीर दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याबाबत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच संबंधित ठेकेदारांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. खोदलेले रस्ते तात्काळ योग्य पद्धतीने बुजवून त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, तसेच या कामादरम्यान कोणत्याही प्रकारचे मोबाईल केबल, वायरिंग किंवा इतर सेवांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांमध्ये या प्रश्नावर तीव्र नाराजी असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा काही राजकीय लोकांकडून बोलले जात आहे.

You cannot copy content of this page