सिंधुदुर्गकन्या पूर्वा गावडे हिची खेलो इंडियासाठी महाराष्टातून निवड…

दिव- दमन येथे 10 आणि 5 किलोमीटर होणाऱ्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत उतरणार..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथिल पूर्वा संदीप गावडे हिची खेलो इंडिया राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे दिनांक 9 व 10 जानेवारी 2026 रोजी दिव- दमन येथे 10 आणि 5 किलोमीटर होणाऱ्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत ती उतरणार आहे

बालेवाडी-पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये जलतरणचे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वा जलतरणचे प्रशिक्षण घेत असून बाबुरावजी घोलप कॉलेज मध्ये प्रथम वर्ष बीकॉम मध्ये शिकत आहे शिक्षणा बरोबरच ती जलतरण क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये सहभाग घेत आहे गतवर्षी तीने खेलो इंडिया बिच गेम मध्ये दोन मेडल पटकवली होती सिंगापूर येथे झालेल्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेत तीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते त्यानंतर आता यावर्षी पुन्हा तिची खेलो इंडियासाठी निवड झाली आहे.

खेलो इंडिया अतर्गत दिव- दमन येथे राष्ट्रीय स्तरावरील 10 व 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा 9 व 10 जानेवारी 2026 रोजी होत आहेत या स्पर्धेकरिता खेलो इंडिया मधून महाराष्ट्र राज्यातून दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्वा गावडे हिचा समावेश आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर यांनी खास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page