अमित परब: माजगाव तसेच चराठा ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता आमचा विरोध..
⚡सावंतवाडी ता.३१-: माजगाव सीमेवर असलेल्या हेळकर स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर ग्रामपंचायत माजगावचा कचरा डेपो करण्याचा घाट सुरू असून याला आमचा पूर्णपणे विरोध आहे अशी प्रतिक्रिया चराठा माजी उपसरपंच अमित परब यांनी दिली.
दरम्यान सदर कचरा डेपो हा अत्यंविधी करण्याच्या जागेवर परिसरात होत असून त्यामुळे माझगाव तसेच चाराटा ग्रामस्थांना याचा त्रास होणार आहे याची माजगाव वासियांनी दखल घ्यावी असे आवाहन परब यांनी केले.
