Headlines

सुप्रिया उर्फ अलका बाबुराव पाटेकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.२३-: शहरातील बिजली नगर येथील रहिवासी सुप्रिया उर्फ अलका बाबुराव पाटेकर ( वय ६४) यांचे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सून, दीर, भाऊजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी दुपारी कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव पाटेकर यांच्या त्या पत्नी…

Read More

असलदे येथील वसंत हरमलकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.२३-:असलदे उगवतीवाडी येथील जुन्या काळातील भजनीबुवा वसंत भिवा हरमलकर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी दुपारी २ वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांचा सार्वजनिक कामामध्ये नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या मृतदेहावर रविवारी असलदे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. –

Read More

शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते भूमिपूजन…

भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार.. कणकवली : तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर, कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरचा रस्ता हा सिमेंट काँक्रीट असून त्याला ७ कोटी ७६ लाख ५१ हजार एवढा भरघोस निधी उपलब्ध करून…

Read More

बाळकृष्ण जाधव तेजस्वी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित…

⚡वैभववाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेतृत्व,सिंपन प्रतिष्ठान मुंबई सिंधुदुर्ग’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांना तेजस्वी फाऊंडेशन ठाणे या संस्थेच्यावतीने अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय तेजस्वी समाजभूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.ठाणे येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात तेजस्वी फाऊंडेशनच्या फाऊंडर प्रा. प्रज्ञा पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.तेजस्वी फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…

Read More

पुरुषोत्तम एरनाक हा ‘सिंधुदुर्ग श्री’चा मानकरी ठरला…

⚡बांदा ता.२३-: द बांदेश्वर फिटनेस क्लब बांदा आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स आणि सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने याठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मानाची “सिंधुदुर्ग श्री २०२५” या बॉडीबील्डिंग स्पर्धेत ठाणे येथील पुरुषोत्तम एरनाक हा ‘सिंधुदुर्ग श्री’चा मानकरी ठरला. सिंधुदुर्गचा रामदास राऊळ हा मोस्ट इंप्रूव्ह बॉडीबिल्डर ठरला तसेच बेस्ट पोझर चा मानकरी वैभव वेंगुर्लेकर ठरला.ही स्पर्धा ५५ किलो,…

Read More

आंबोली पोलिसांविरोधातील ठिय्या पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनाने स्थगित…

आंबोली,ता.२३: चार चाकी बलेनो गाडी ने ठोकून जायबंदी झालेल्या महिलेला आणि जखमी झालेल्या मुलाला अपघात झाल्याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी आंबोली पोलीस स्थानकासमोर आज ११ वाजलेपासून नातेवाईक व ग्रामस्थ यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते.सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या ठिकाणी भेट दिली.तसेच आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी योग्य रीतीने संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येईल. गाडी…

Read More

हास्यकल्लोळ स्पर्धेत गावडेवाडी ग्रुप विजेता..

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण : स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांची गर्दी.. कणकवली : शिमगोत्सवानिमित्त कलमठ बाजारपेठ येथील श्री देव काशीकलेश्वर मांडावर आयोजित केलेल्या हास्यकल्लोळ स्पर्धेत प्रथम क्रमांक गावडेवाडी ग्रुपने पटकाविला. द्वितीय क्रमांक अस्सल मालवणी क्रिएशन तर तृतीय क्रमांक गोरक्षणाथ मित्रमंडळाने पटकाविला. दरम्यान, ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांची मांडावर गर्दी झाली होती.या स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले होते. या…

Read More

अधिकारी सकारात्मक मानसिकतेचे असतात तेव्हा जनहिताचे काम उभे राहते…

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे गौरवोद्गार.. ⚡कणकवली ता.२३-: अधिकारी जेव्हा सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कारकिर्दीमध्ये पाहिले तर रेस्ट हाऊस, रस्ते यांची परिस्थिती चांगली झाली, कणकवली रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले अशी अनेक काम त्यांनी केलेली आहेत. चांगले कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र…

Read More

आणखी नविन एसटी बसेस व २० मिनी बसेस उपलब्ध होणार…

पालकमंत्री नीतेश राणे यांची माहिती:कणकवलीत नविन बसेसचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. कणकवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील काही बसेस आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात देवगड व अन्य तालुक्यात बसेस पुरवल्या जातील. ज्या एसटी बसेस प्राप्त…

Read More

धामापूर येथील भगवती मंदिरात ३० मार्चपासून रामनवमी उत्सव…

⚡मालवण ता.२३-:धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरात श्री देवी भगवती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दि. ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त एकांकिका व कीर्तन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव होणार आहे. दि. ३० रोजी या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे….

Read More
You cannot copy content of this page