⚡कणकवली ता.२३-:
असलदे उगवतीवाडी येथील जुन्या काळातील भजनीबुवा वसंत भिवा हरमलकर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी दुपारी २ वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांचा सार्वजनिक कामामध्ये नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या मृतदेहावर रविवारी असलदे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
–
