Headlines

बांद्यात १९ जुलै रोजी ७ वे महा रक्तदान शिबिर…

बांदा/प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर, बांदा व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर रविवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत व्यापारी भुवन, बांदा (विठ्ठल-रखुमाई मंदिर शेजारी) येथे होणार आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे निरोगी व पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर (मो. ९५०३८७१९२४) व अर्णव स्वार (मो. ९०७५७२९९६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page