Headlines

कणकवलीत रस्त्यालगतच्या गटारात सापडला ५ ते ६ फुटांचा अजगर…

मराठा मंडळ रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी:सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू..

⚡कणकवली ता.०४-: शहरातील मराठा मंडळ रोड परिसरात रस्त्यालगतच्या गटारामध्ये सुमारे ५ ते ६ फुटांचा अजगर आढळल्याने शनिवारी परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. कोणतीही जीवितहानी न होता बचाव मोहीम यशस्वी पार पडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

पावसाळ्यात साप व इतर वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी अशा प्राण्यांना इजा न करता त्वरित वनविभाग किंवा सर्पमित्रांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page