बांदा/प्रतिनिधी
. येथील ऐतिहासिक नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, गुरुनाथ नार्वेकर, सुनील नातू, मिलिंद महाजन, अभिजित पोरे, सालू परेरा, आनंद देसाई, सुजय चांदेकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, अमिता परब, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब महाराज यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात आला.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करताना मान्यवर व वाचक.
पुष्पहार अर्पण करून बापूसाहेब महाराजांची पुण्यतिथी साजरी…
