बांद्यात शिमगोत्सवनिमित्त मांडकरी मांड उभाबाजार येथे २६ व २७ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: खास शिमगोत्सवनिमित्त मांडकरी मांड उभाबाजार येथे २६ व २७ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २६ रोजी रात्री ९ वाजता घुमट वादन होणार आहे. रात्री ९ वाजता विठ्ठल मंदिर रंगमंच येथे गांधीचौक मित्रमंडळ व मांडकरी प्रासादिक नाट्यमंडळ बांदा यांच्यावतीने ‘एकदा पहाव करून’ हे दोन अंकी धमाल म्युझिकल कॉमेडी नाटक स्थानिक कलाकार सादर करणार आहेत.
या नाटकाचे लेखक रत्नाकर मतकरी आहेत. दिग्दर्शन प्रा अरुण सुतार व सहदिग्दर्शन समीर सातार्डेकर यांनी केले आहे. या नाटकात नारायण आकेरकर, आसिफ खान, सच्चीदानंद मांजरेकर, अनुज बांदेकर, सौ. अवंती पंडित, गौतमी तारी, सौ. अपेक्षा पेंडसे, केदार कणबर्गी, रोहित बांदेकर, सौ. निशा बहिरे या स्थानिक कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
गुरुवार दिनांक २७ रोजी सकाळी ९ वाजता देवांवर गुलाल उधळण, घुमट वादन होणार आहे. सायंकाळी ४ वाजता पाटेश्वर मंदिर ते होळीखुंट येथे सवाद्य रोबट फेरी होणार आहे. रविवार दिनांक ३० रोजी सकाळी मांडावर व्यापारी वर्गाची सत्यनारायण पूजा होणार आहे. रात्री ९ वाजता देवांचे सार्वजनिक कौल आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

You cannot copy content of this page