⚡कणकवली ता.२४-: तालुक्यातील खारेपाटण विभागातील जिजामाता नगर अंतर्गत रस्ते विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा शिवसेना खारेपाटण व तळेरे विभागाच्यावतीने संपन्न झाला. या विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश सावंत पटेल, उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, गुरू शिंदे (ग्रामपंचायत सदस्य), सुहास राऊत (शहर प्रमुख), मंगेश ब्रह्मदंडे (संचालक, जिल्हा कृषी समिती), तसेच सुरेश आप्पा गुरव, संतोष राऊत, कुबल गुरुजी, उन्हाळकर गुरुजी, किशोर माळवदे, तृप्ती पाटील, सुभाष गुरव, दत्ताराम गुरव, प्रशांत गाठे, सागर कांबळे, संदीप पाटील यांसह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्ते विकासकामांसाठी आ. किरण सामंत, आ. निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. ग्रामस्थांनी देखील विशेष आभार मानले. भविष्यातही अशा पायाभूत विकास प्रकल्पांसाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
