⚡मालवण ता.२३-:
मालवण तालुक्यातील कट्टा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा कट्टा यांच्या मागणी नुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून प्राप्त झालेल्या एक संगणक संचाचे वितरण आज ओरोस येथे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश वाईरकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनेश ठाकूर यांच्याकडे करण्यात आले.
कट्टा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेने याची एक संगणक मिळावा अशी मागणी केली होती. यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी याचा पाठपुरावा करून आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून संगणक संच प्राप्त करून दिला. आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश वाईरकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनेश ठाकूर यांच्याकडे पालकमंत्र्यांच्या हस्ते संगणक संच सुपूर्द करण्यात आला.
संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे तसेच पाठपुरावा केल्याबद्धल आमदार निलेश राणे यांचे शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक पालक शिक्षक विद्यार्थी यांनी आभार मानले आहेत .
