बिडवलकर मृत्यू प्रकरणी ३ संशयितांच्या कोठडीत वाढ…

एका संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणी चार पैकी सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींची १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली तर चौथा संशयित अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत.चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजन संपन्न…

डिगस, आवळेगाव, सिंधुदुर्गनगरी, पोखरण येथील वर्षानुवर्षे प्रलंबित विकासकामांना सुरुवात.. ⚡ओरोस ता.१३-: आज आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील डिगस इजिमा-४४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३० लाख, आवळेगाव पाटकरटेंम्ब जरीमरी मंदिर जाणारा रस्ता करणे-०५ लाख तर सिंधुदुर्गनगरी जिल्हा कारागृहाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-२८ लाख ग कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावेत…

तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे प्रतिपादन:कुडाळ मध्ये जय भीम पदयात्रा आयोजन.. कुडाळ : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन वेचले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे असे प्रतिपादन…

Read More

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत आयोजित भव्य आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१३-:माजी आमदार व उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत काझी शहाबुद्दीन सभागृह येथे आयोजित केलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा जवळपास १५० हून अधिक जणानी लाभ घेतला तर यात अत्याधुनिक व ईसिजी,जर्मन स्कॅनिंग पद्धतीने तपासणी करण्यात आली.या भव्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

मालवणच्या समुद्र जैवसंपत्तीचे रक्षण व संवर्धन ही सामाजिक जबाबदारी…

स्टॅलिन दयानंद:मालवणात समुद्ररक्षक संमेलन संपन्न.. ⚡मालवण ता.१२-:मालवणची समुद्र संपत्ती जैवविविधतेने परिपूर्ण आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी वनशक्ती संस्थेतर्फे नेहमीच प्रयत्न करण्यात येतील. मात्र ही एक सामाजिक जबाबदारी असून स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे पार पाडायला हवी, असे प्रतिपादन वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी येथे बोलताना केले. मालवणच्या समुद्रात भारतातील पहिल्या स्थानिक सहभागातून पार…

Read More

किल्ले सिंधुदुर्गचा ३५८ वा वर्धापन दिन साजरा…

मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या सागरातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५८ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पूजन, सागर पूजन व सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांचे पूजन करण्यात आले. तसेच शिवप्रार्थना म्हणत, मर्दानी खेळ सादर करत आणि शिवरायांचा…

Read More

पाच दिवसीय निशुल्क योग शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.१२-: आजगाव शाळा नं.१ येथे पतंजली योगपीठ सिंधुदुर्ग आणि शिवप्रेमी मित्रमंडळ आजगाव-धाकोरे आयोजित पाच दिवसीय निशुल्क योग शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. योग मार्गदर्शक विद्याधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले.श्री पाटणकर यांनी या योग शिबिरात आपले शरीर रोगमुक्त होण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, दैनंदिन जीवनात ताण तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी,…

Read More

गटार बांधकाम कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण पेळपकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न…!

⚡बांदा ता.१२-: जिल्हा नियोजन निधीतून बांदा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये पानवळ येथील धारगळकर सर्व्हिसिंग सेंटर ते काजरोबा देवस्थान गटार बांधकाम कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण पेळपकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत, जावेद…

Read More

सुमारे ३०० वर्षानंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न…

⚡देवगड ता.१२-: “देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सवाने मंदिरातील चैत्र मासातील वार्षिक उत्सवाची सांगता झाली. “सुमारे तीनशे वर्षांनंतर खंडित असलेल्या या मंदिरातील वार्षिक उत्सव पुन्हा यावर्षी पासून सुरु झाला. होळी पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हा उत्सव असतो. गुढीपाडव्यानंतर चैत्र मासातील शिव विष्णूचा नवरात्रोत्सव उत्सव रामनवमी पर्यंत असतो. राम नवमीला…

Read More

एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रकपदाचा प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे अतिरिक्त पदभार…

⚡कणकवली ता.१२-:एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक पदी प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एमडी कुसेकर यांनी तसे आदेश जारी केले आहेत. प्रज्ञेश बोरसे हे रत्नागिरी येथे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या एकूणच कामाची दखल घेऊन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पदाचा अतिरिक्त…

Read More
You cannot copy content of this page