लखमराजे सावंत भोसले:एसआरएम कॉलेजचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात..
कुडाळ : जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमची शिक्षण संस्था आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण संस्था एकत्र येऊन चांगले काम करूया. भविष्यात मुलांसाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखम राजे सावंत भोसले यांनी व्यक्त केला. कमशिप्र मंडळ संचालित संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ४१ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला युवराज लखम राजे सावंत भोसले, संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, देशपांडे फाउंडेशनचे आनंद वरीया, सुहाग शिरोडकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, संस्था पदाधिकारी का आ सामंत, प्रसाद अणावकर, डी एस पाटील, अनंत वैद्य, महेंद्र गवस, प्रदीप आंगचेकर, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, शिक्षण तज्ञ प्रवीण शेवडे, माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ऍड. निलंगी रांगणेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र गीत आणि स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या ४१ व्य वर्धापन दिनाचा शुभारंभ करण्यात आला. प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविकातून कॉलेजची २५ जून १९८४ पासूनची वाटचाल, विविध क्षेत्रात मिळलेलं यश याबद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधून माहिती दिली. तसंच संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी संस्थेचा इतिहास आपल्या मनोगतातून सर्वांसमोर उभा केला.
आपल्या दोन्ही संस्थानी एकत्र शिक्षण क्षेत्रात काम केले तर भविष्यात मुलांसाठी ते फार उपयुक्त होईल असा विश्वास युवराज लखम राजे सावंत भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. कोणतेही काम छोटे व मोठे नसते ते मन लावून केले पाहिजे ,विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या कौशल्याधारित शिक्षणामध्ये छोटा मोठा कामाचा भेद न करता शिकण्याची जिद्द बाळगावी, तसेच परिपूर्ण शिक्षण घ्यावे. पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज तसेच श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा आपण त्यांच्या पुण्याईने असाच सुरू ठेवणार असून कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाला ज्या ज्या वेळी आपल्या सहकार्याची आवश्यकता असेल त्यावेळी शंभर टक्के आपण सहकार्य करणार असल्याचे या प्रसंगी त्यांनी सांगितले. आपली गरज काय आहे आणि आपली आवड लक्षात घेऊन शिक्षण घेण्याची काळाची गरज आहे असे ते या प्रयंगी म्हणाले. सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या पुण्याईने कार्य करण्याची आपल्याला आज संधी मिळत आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक कामामध्ये आपण सर्व एकत्र काम करूया असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी कराची महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचा इतिहास, बापूसाहेब महाराज, कुडाळ हायस्कुल यावर आपल्या ओघवत्या भाषण शैलीत प्रकाशझोत टाकला. कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी. त्यांनी देखील आपल्या छोटेखानी भाषणातून महाविद्यलयाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी देशपांडे फाउंडेशनचे आनंद वरीया, माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ऍड निलंगी रांगणेकर, सचिव प्रा. अरुण मर्गज यांनी देखी मनोगत व्यक्त करत कॉलेजच्या ४१ व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. लखम राजे सावंत भोसले, प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, प्रा. डॉ. अनंत लोखंडे, गुणवंत कर्मचारी निलेश जाधव, विद्यार्थी सागर कुडाळकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कॉलेजचा वार्षिक विशेष अंक भरारीच प्रकाशन युवराज लखम राजे सावंत भोसले यांच्या सहित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. भरारी वार्षिकांकाचे संपादक प्रा .डॉ . भारत तुपेरे यांनी भरारीबद्दल थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयामध्ये देशपांडे फाउंडेशनच्या ऑनलाईन लर्निंग पोर्टलचे उद्घाटन युवराज लखम राजे सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला भाईसाहेब तळेकर, सुरेश चव्हाण, राजू परब, माजी प्राचार्य प्रा अरुण पणदूरकर, अरुण मर्गज, शिवाजी घोगळे, माजी कर्मचारी डी एन सावंत, श्री. मांजरेकर, सगुण पेडणेकर, रत्नाकर जोशी, इतर मान्यवर माजी विद्यार्थी, प्राध्यपक, प्राध्यापकेटर कर्मचारी,आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच स्वागत प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा.डॉ.कमलाकर चव्हाण यांनी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र ठाकूर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.