⚡मालवण ता.२५-:
महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन व दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२८ व रविवार दि. २९ जून या कालावधीत राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षा बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ एम.आय.डी.सी. येथे आयोजित करण्यात आलेली आहे
या पंच परीक्षेची नोंदणी फी १५०० असणार आहे. तरी राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या जिल्हा पंच परीक्षा पास झालेल्या पंचानी दि. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे. २८ जून रोजी मार्गदर्शन व २९ जून रोजी सकाळी १० वाजता परीक्षा होणार आहे. या राज्य पंच परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या जिल्हा पंचांनी आपली नावे २५ जूनपर्यंत जिल्हा संघटना सचिव संजय पेंडूरकर 9422392790 व कोषाध्यक्ष दुर्वांक मेस्त्री 9767592160 यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.