दीपिका आंबेरकर यांना ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान…!

⚡मालवण ता.२५-:
मालवण तालुक्यातील चौके गावच्या सुकन्या आणि पुणे येथील सुप्रसिद्ध मेडिकल योग थेरेपिस्ट व योग प्रशिक्षक दीपिका आंबेरकर यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या वतीने प्रतिष्ठेचा मानला गेलेला योगरत्न पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

दीपिका आंबेरकर या पुणे येथे सन २०१५ पासून योग व मेडिकल योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार तसेच उद्योजक मनोज दांडगे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग) डॉ. नितीन राजे पाटील, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. सतीश कराळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्रा. कुणाल महाजन, मनोहर कानडे, व आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दीपिका आंबेरकर यांना योगरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page