गोव्यातील भाजपचे माजी खा नरेंद्र सवाईकर यांचा आरोप:सिंधुदुर्गनगरी येथे भाजपने केला आणीबाणी बंदिंचा सन्मान..
ओरोस ता २५
मी आणि मीच देशात राज्य करू शकते, ही भावना निर्माण झाल्याने आणीबाणी लादली गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायद्याने मिळालेल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम काँग्रेसने या माध्यमातून केले. जगातले सर्वात मोठे संविधान भारताचे आहे. अशा संविधानाची हत्त्या आणीबाणी तून केली गेली. संविधानातील कलम ३५२ चा दुरुपयोग काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करून लोकशाहीचे चार स्तंभ संपविण्याचा काम या काळात केले. संविधान खतऱ्यात असल्याचे काँग्रेस आता म्हणत आहे. परंतु या संविधानाची हत्या करण्याचे काम कनोग्र्सच्या इंदिरा गांधी यांनी केले होते, असा आरोप भाजपचे गोवा राज्यातील माजी खा नरेंद्र सावईकर यांनी केला.
२५ जून १९७५ रोजी देशात लागू केलेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजप पक्षाने सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन येथे “संविधानाची हत्या दिवस” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी विशेष अतिथी म्हणून भाजपचे गोवा राज्यातील माजी खा नरेंद्र सावईकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा समन्वयक राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, विजयकुमार मराठे, अजित गोगटे, पुकराज पुरोहित, संध्या तेरसे, प्रमोद रावराणे, संदीप मेस्त्री, प्रसन्न देसाई, चारुदत्त देसाई, मनोज रावराणे, संदीप साटम, प्रमोद रावराणे उपस्थित होते.