Headlines

स्मार्ट मीटर विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दिली धडक…

सावंतवाडी: एका कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात रोजी श्री. निशिकांत तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय, सावंतवाडी येथे धडक दिली. यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी, स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश केंद्रीय स्तरावरून आल्याचे सांगितले. त्यांनी हे लेखी स्वरूपात दिल्यानंतरही, हे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यापुढे…

Read More

विनापरवाना बंदुका प्रकरणी पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…!

कुडाळ : विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ आणि आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (दोघेही रा. माणगांव) या दोघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी यशवंत राजाराम देसाई (आजरा-कोल्हापूर), प्रकाश राजाराम गुरव (आजरा) आणि सागर लक्ष्मण घाडी (नांदरुख-मालवण) यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडी…

Read More

सैन्याच्या एनसीसी भरती प्रक्रियेत १८ विद्यार्थ्यांची निवड…

⚡मालवण ता.०४-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही एअर फोर्स, पोलीस, तटरक्षक दल व इतर संरक्षण दलामध्ये आपले करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार आर्मी विभागाकडून एनसीसी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी सहभागी झालेल्या ३२ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी अशा १८…

Read More

कणकवलीतील महसूल विभागाच्या नऊ मंडळांमध्ये महाराजस्व अभियान संपन्न…!

⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व दिनांक १ ते ७ ऑगस्ट २२०५ या कालावधीत महसूल सप्ताह -२०२५” साजरा येणार आहे. त्यानुसार कणकवली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय नऊ ठिकाणी ४ ऑगस्ट रोजी राबविण्यात आला. या उपक्रमात महसुल विभागाच्या विविध योजनांची जनजागृती व नागरिकांना सेवा…

Read More

जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव गोड जाणार…

सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांचे राज्य शासनाचे थकीत मानधन मिळणार:जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माहिती.. ⚡ओरोस ता ४-: जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव गोड जाणार आहे. सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांचे राज्य शासनाचे थकीत मानधन त्यांना मिळणार आहे. यासाठी ४ कोटी ६४ लाख ६०…

Read More

स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करून वाटचाल करा…

गजानन कांदळगावकर:दैवज्ञ समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा.. ⚡कुडाळ ता.०४-: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना स्पर्धा वाढली आहे. यश सहज सोपे नाही. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) आपण कितीही नाकारले तरी आपल्याला त्याला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही ध्येय निश्चित करा पुढे जाण्याची क्षमता आपल्या समाजातील मुलांमध्ये आहे. आताच करिअर  निवडा. भविष्यात आपल्या समाजातील मुले आनंदी जीवन जगताना  व्यवसायिक…

Read More

पिंगुळीत फास लावलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह…

⚡कुडाळ ता.०४-: पिंगुळी मुस्लीमवाडी येथील बरकत अल्लीदाऊद खान ( 38) यांने स्वयंपाक घरातील लोखंडी बारला ओढणीने गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर बिलाल रहीमतुल्ला शेख रा पिंगुळी मुस्लीमवाडा याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सकाळी सात वाजता बरकत खानचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत घरात आढळून आला. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Read More

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आयडियलच्या विद्यार्थ्यांचे यश…!

⚡कणकवली ता.०४-: यू. आय. एस. मीडिया यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे प्रशालाचा विद्यार्थी आयुष अवधीत बागवे (९वी) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे तर याच स्पर्धेत प्रशालेचा तनय सिद्धेश नातू (९ वी) याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे….

Read More

एक राखी लाडक्या देवाभाऊसाठी अभियान…

जिल्हा भाजप एक लाख राख्या पाठविणार:लाडक्या बहिणींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन,प्रभाकर सावंत.. ⚡ओरोस ता ४-: महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी लाडका भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रक्षाबंधन औचित्यावर महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवरून १०० याप्रमाणे एकूण १ कोटी राख्या आणि त्यांच्यासाठी शुभसंदेश पाठविण्याचे एक विशेष अभियान नियोजित केलेले आहे….

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत बसविण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण…

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन डायलेसिस मशीनचे लोकार्पण आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले तर रुग्णांच्या सोयीसाठी सावंतवाडी नंतर दोडामार्ग आणि वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात लवकरच प्रत्येकी दोन डायलिसिस मशीन बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्या दरम्यान दिली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या मशीनचे लोकार्पण आज श्री. केसरकर…

Read More
You cannot copy content of this page