अन्यथा आंदोलनाचा इशारा:वृक्षवल्ली संघटनेची वनविभागाला निवेदन..
⚡ सावंतवाडी ता.०९-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील २० वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या हत्ती पकड मोहिमेअंतर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या कामांच्या खर्चाबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी वृक्षवल्ली संघटना, सावंतवाडीच्या वतीने वनविभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.वृक्षवल्ली संघटनेचे अध्यक्ष श्री. अजित सांगलेकर यांनी सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना निवेदन सादर केले आहे.
ते म्हणाले, २०२० ते जानेवारी २०२५ या कालावधीत वनविभागामार्फत हत्ती पकड मोहिमेसाठी झालेल्या खर्चाची माहिती, सदर खर्च कोणकोणत्या बाबींवर करण्यात आला, तसेच प्रत्यक्षात किती वृक्षलागवड व संवर्धन झाले याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी.
सदर माहिती सात दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा वृक्षवल्ली संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाच्या वेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी अजित सांगेलकर,अजय सावंत, राजू कासकर, मिलिंद सावंत, आदी उपस्थित होते
