⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला एस. टी. स्टॅन्ड नजिक रा.प. वेंगुर्ला स्थानकावरील श्री साई मंदिराचा २९ वा वर्धापन उत्सव सोमवार दि. १९ जानेवारी ते मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. यनिमित्त सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वा.गणेश पूजन व धार्मिक विधी, सकाळी ९ वा. वेंगुर्ला शहरातून श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक, सायंकाळी ४ वा. स्थानिकांची भजने, सायंकाळी ५ वा.श्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, तेर्सेबांबार्डे यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ७ वा.
साईंची महाआरती,
संध्याकाळी ७.३० वा.
साईंची पालखी मिरवणूक,
रात्रौ ९ वा.पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा ‘कर्म प्रारब्ध’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ८ वा. महारुद्र जप सांगता,
सकाळी १० वा.
श्री साईबाबांची महापूजा,
सकाळी ११ वा.
महाआरती व महानैवेद्य,
दुपारी १२ वा. ते सायंकाळी ४ वा. पर्यंत महाप्रसाद,
संध्याकाळी ५ वा. भजने,
संध्याकाळी ७ वा.साईंची महाआरती, सायंकाळी ७.३० वा.साईंची पालखी मिरवणूक, रात्री ९ वा.
धनुप्रिया प्रोडक्शन निर्मित
‘एकापेक्षा एक’ हे
धमाल कौटुंबिक फार्सिकल दोन अंकी मराठी मालवणी नाटक (प्रस्तुत प्रमोद धावडे, विकास करंगुटकर, दाभोली) सादर होणार आहे. भाविकांनी या वर्धापन सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनासह धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन
श्री साई मंदिर देवस्थान कमिटी व कर्मचारी वृंद रा.प. वेंगुर्ला आगार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
फोटो :
