⚡मालवण,ता.०८-:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झोटिका रिसॉर्ट येथे ७ जानेवारीला उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्याचा प्रारंभ स्व. शिवरामभाऊ जाधव व स्व. डी. बी. ढोलम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सेवानिवृत्त महिला कर्मचारी सौ स्नेहल जाभवंडेकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रजनी कदम, रसिका कोठारी, बबीता कविटकर, सुमेधा पंडित, ज्योती शिरसाट आदी व इतर उपस्थित होते
या मेळाव्याचे विशेष औचित्य साधून ८० वर्षांवरील सेवानिवृत्त सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक सेवानिवृत्त सेवकांनी आपली मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी या मेळाव्याला खास उपस्थिती लावून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी डी. डी. आरेकर, देवानंद लोकेगांवकर, मिलिंद सावंत, सतीश नाईक, अमित पंडित, रामदास रासम, नंदकुमार रेडकर, आर. वाय. सावंत, अजित महाडिक व इतर सेवानिवृत्त सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. बी. शिरसाट यांनी केले.
