शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणार स्पर्धा..
⚡कुडाळ ता.०९-: कोकणरत्न भूतपूर्व संसदपटू बॅ. नाथ पै यांची रविवार दि. १८ जानेवारी रोजी ५५ वी पुण्यतिथी आहे. या निमित्त कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षणसंस्थेतर्फे शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 10.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय आणि महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक पारितोषिके दिली जाणार आहेत. तरी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिफारस पत्रासहित या स्पर्धेत भाग घ्यावाअसे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
नाव नोंदणी स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य प्रा अरुण मर्गज (९४२३३०२८५९), प्रा. परेश धावडे (९४२०८२२८७८), प्रा. शांभवी आजगांवकर (९४२२५३५६९३), श्रीम. चित्रा कुंटे (८५५०९२२८५५), प्रा.मंदार जोशी (9405291589) यांच्या कडे करावी. नाव नोंदणी शुक्रवार दिनांक १६ जानेवारी २०२६ पर्यंत करायची आहे.
स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे, सदर स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटात घेतली जाईल. शालेय गटात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतेचे विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालयातील १२ वी नंतरचे विविध पदवी व पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थी) सहभागी होऊ शकतात, एका शाळेतील व एका महाविदयालयातील फक्त दोन विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी करून घेतले जातील, स्पर्धा केवळ मराठी माध्यमातून घेतली जाईल. महाविद्यालयीन स्पर्धकाला विषय सादरीकरणासाठी ५+२ मि. इतका वेळ दिला जाईल. शालेय गटातील स्पर्धकाला विषय सादरीकरणासाठी ४+१ मि. इतका वेळ दिला जाईल. स्पर्धकाजवळ शाळेचे / महाविदयालयाचे ओळखपत्र व प्राचार्यांच्या सहीचे सहभाग पत्र असणे आवश्यक आहे, परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील. इच्छुक स्पर्धकांनी १६ जानेवरी २०२६ पर्यंत स्पर्धा समितीकडे नाव नोंदणी करावी. स्पर्धकांसाठी चहा व दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात येईल.
या स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत. शालेय गट – १) स्पर्धा परीक्षा ताण : यशाची वाट की मानसिक आरोग्याचा प्रश्न? २) तंत्रज्ञानामुळे माणून जवळ आला की अधिक एकाकी झालाय? ३) नैतिकतेचा ऱ्हास करी संस्कृतीचा नाश ४) आजच्या काळात बॅ. नाथ पै यांची गरज.
महाविद्यालयीन गट – १) युवक आत्महत्या : वैयक्तिक समस्या की सामूहिक अपयश ? २) AI -तरुणाईला शाप की वरदान ? ३) ३) सोशल मिडियामुळे घडणारी पिढी: प्रगती की अधोगती ? ४) सामाजिक सुसंवाद कमी होतोयः चिंता आणि चिंतन.
स्पर्धेतील विजेत्यांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. महाविद्यालयीन गट – १ ) प्रथम ५००० आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, २) द्वितीय ४००० आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, ३) तृतीय ३००० आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, ४) उत्तेजनार्थ 2- प्रत्येकी रोख रु.१००० व प्रमाणपत्र. शालेय गट-1) प्रथम क्रमांक -रोख रुपये 4000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, 2) द्वितीय क्रमांक- रोख रुपये 3000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, 3) तृतीय क्रमांक-रोख रुपये 2000 व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, 4) उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रोख रुपये 1000.व प्रमाणपत्र.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्यासह संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
