Headlines

गिरिजा राऊत यांना न्याय मिळालाच पाहिजे…

वैभववाडी भाजप महिला मोर्चाची ठाम भूमिका:विनायक राऊत यांच्या कथित कृत्याचा निषेध..

⚡वैभववाडी ता.१३-: बुवाबाजी व जादूटोणा करून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कथित कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कोकणच्या या “खरातावर” कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित महिला गिरिजा राऊत यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका वैभववाडी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्राची तावडे यांनी व्यक्त केली. एका महिलेवर इतके गंभीर अत्याचार होत असताना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आता गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वैभववाडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्राची तावडे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार तसेच पंचायत समिती सदस्या सुवर्ण संसारे उपस्थित होत्या.
यावेळी प्राची तावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवरही कडाडून टीका केली. महिलांच्या प्रश्नांवर आणि हक्कांवर नेहमी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आता कुठे लपून बसल्या आहेत? गिरिजा राऊत प्रकरणात त्या मुग गिळून गप्प का आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विविध स्तरांवर आवाज उठविण्यात येईल आणि संबंधित महिलेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवला जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
तसेच पीडित गिरिजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, अशी ठाम भूमिकाही महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.

You cannot copy content of this page