सावंतवाडी वैश्यवाणी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी अमित गवंडळकर…

⚡ सावंतवाडी ता. ०८-: सावंतवाडी वैश्यवाणी युवा संघटनेची बैठक वैश्य भवन, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
बैठकीदरम्यान सर्वानुमते संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी श्री. अमित नागेश गवंडळकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्री. सुनील विलास मिशाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी श्री. श्रेयस साईनाथ मुंज तर खजिनदारपदी श्री. नित्यानंद कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील युवकांना संघटित करून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page