Headlines

कवी रुजारीओ पिंटो यांच्या ‘माँ मेरी’ हिंदी कवितासंग्रहाचे १५ ऑगस्टला मालवणात प्रकाशन…

मालवण दि प्रतिनिधी स्वांतत्र्यदिनाच्या औचित्य साधून कोकणातील सुप्रसिद्ध कवी रुजारीओ पिंटो यांच्या ‘माँ मेरी’ या पहिल्यावहिल्या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालवण-कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात सायंकाळी ४.३० वाजता पार पडणार असून, तमाम काव्यप्रेमी आणि साहित्यिकांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले….

Read More

कणकवलीत १.७९८ किलो गांजासह दोघे ताब्यात…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई:१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.. कणकवली : गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १.७९८ किलो गांजा तसेच दोन दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. कणकवली पोलीस ठाणे…

Read More

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ…

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन:माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा ⚡सावंतवाडी ता.१३-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे…

Read More

मालवणात टोपीवाला हायस्कुलने काढली तिरंगा रॅली

मालवण : (प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाच्या मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात भारतमातेविषयी अभिमान अशा उत्साही वातावरणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’, ‘देश प्रथम’ आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात…

Read More

घोषणांनी दणाणला कट्टा परिसर; वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

मालवण दि प्रतिनिधी “वंदे मातरम्!”, “भारत माता की जय!”, “जय जवान, जय किसान!”, “भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!” अशा आसमंत दणाणून सोडणाऱ्या देशभक्तीपर घोषणांनी कट्टा परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथून प्रभात…

Read More

सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा १५ ऑगस्ट रोजी शुभारंभ

मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA), कोकण विभागीय कार्यालयाच्या वतीने ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आचरे-कुडाळ येथील हॉटेल आराध्या, झाराप झिरे पॉईंट, झाराप-पत्रादेवी महामार्ग येथे करण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व…

Read More

स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी मालवणात देशभक्तीपर गीत गायन व निबंध स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधीस्वातंत्र्य दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या निमित्ताने समूह साधन केंद्र, मालवण यांच्या वतीने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत तालुकास्तरा वरील विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास व त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी तसेच…

Read More

एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड केंद्राचा भोंगळ कारभार..

कुडाळ बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची परवड:ठाकरेंच्या शिवसेनेने अधिकाऱ्याला घातला घेराव.. ⚡कुडाळ ता.१३-: १ सप्टेंबर पासून स्मार्ट कार्ड नसेल तर सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही असं परिवहनमंत्र्यांनी जाहीर केलेले असताना कुडाळ बस स्थानकात असलेले कार्ड वितरण केंद्र दोन दोन दिवस बंद ठेवून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. त्यामुले या स्मार्ट कार्डचे प्रमुख लाभार्थी…

Read More

पाट हायस्कूलमध्ये खाद्य उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थी आणि पालक यांनी तयार केले विविध खाद्यपदार्थ कुडाळ : खाद्यपदार्थ विक्रीवर शालेय परिसरात विविध निर्बंध आल्यामुळे मुलांना आरोग्यासाठी चांगले खाद्य कोणते हे समजावे म्हणून इको क्लब आणि हरित सेना स्कूलच्या वतीने खाद्य उत्सव घेण्यात आला. यामध्ये मुलांनी आणि पालकांनी बऱ्याच वस्तूंची निर्मिती केली आणि विक्री ही केली. एका तासामध्ये तब्बल पंधरा हजारापर्यंत खाद्यपदार्थांच्या वस्तूंची…

Read More

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश

कुडाळ : एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल.देसाई विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता -सातवी)उल्लेखनीय असे यश संपादन करून प्रशालेची मान उंचावली आहे. यामध्ये भार्गव शंकर पेडणेकर यांने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. भक्ती योगेश तेलीकोचरेकर व विघ्नेश अमर सावंत या विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण…

Read More
You cannot copy content of this page